Posts

Showing posts from 2011

भारत एक महासत्ता ............

 भारत एक महासत्ता ............   देशात एक हि भूक बळी देवू जावू नका ..सर्वोच्च्या न्यायालयाचे सरकारला आदेश आणि त्याच दिवशी पेट्रोल ५ रु यांनी महागले.  २०२० साली भारत नक्की महासत्ता होईल पण देशात राहील फक्त आणि फक्त गरीब जनता. मग कितीही तुम्ही आधुनिक तंत्राद्यान वापरले तरी तुम्हाला कोणीही हरवू शकेल कारण उपाशी पोटी कोणी युद्ध जिंकू शकत नाही. तुम्ही जनतेला विचार त्यांना महासत्ता असणारा देश हवा आहे का? उत्तर होच असेल पण त्यांची गरज काय आहे महासत्ता कि भूक? त्यांचे उत्तर असेल प्राथमिक गरजा. ज्यांची परत एकदा आठवण करून द्यावी लागेल आपल्या भ्रष्ट  नेत्यांना आणि ती म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा.   गेल्या ९ महिन्यात पेट्रोल १८ रु नि वाढले. कच्च्या तेलातून फक्त पेट्रोल, डीझेल आणि ग्यास नाही तयार होत इतरही उत्पादने निघतात पण दर फक्त यांचेच का वाढतात? हा सगळा खेळ चालू आहे तो सर्व राजकीय पक्षांचा. पण हे  मात्र  खरे  आहे भारत हा एक महासत्ता असेल जेथे  जगातील जास्तीत जास्त श्रीमंत असतील आणि जास्तीत जास्त गरीब हि.  मनात खूप आहे पण मला आठ...

भारत देश महान

Image
 कोणी घर देता का घर ? असे म्हणत आहे रोज महासत्ता होत आहे भारत पण देशोधडीला जनता आहे लागत काळ्या पैश्याच्या फासाने मरत आहेत येथील मने येत आहेत पूर्वीचे दिवस परत गरीब, गरीब होत आहे, श्रीमंत, होतायेत श्रीमंत कोण घालेल याला आळा? जो तो आहे पैश्याच्या मागे कोणी वाली नाही उरला मोठे घर पोकळ वासा असा हा अमुचा भारत देश महान

मला हि वाटते

Image
मला हि वाटते तुझ्या आनंदात सामील व्हावे मला हि वाटे तुझ्या दु:खात सामील व्हावे पण तू का असा दुरावा केलास माझेच मला कळेना चूक होती माझी पण ती तुला हि मान्य होती वेळ निघुनी जाण्याआधी का नाही अडवलेस? मला दूर केलेस तूच पण तुझी वाट  मी पाहत होतो कितेकदा परतुनी हि आलो पण याचवेळी मी अशी का चूक केली परत न येण्याची जी निरंतर बोचत राहते क्षणाक्षणाला.

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ यावेळी मनासारखी increment होईल का? नाही झाली तरी वाढवून मिळेल का? सांग सांग भोलानाथ का यावेळी पण चेहरे बघून increment होईल त्यासाठी जास्त मेक अप करून येवू का? सांग सांग भोलानाथ यावेळी पण हातावर तुरी मिळेल का? सांग सांग भोलानाथ सांग सांग भोलानाथ

आयुष्य

आयुष्य म्हणजे चुलीतले जळते निखारे जास्त वेळ हातात ठेवले तर हात पोळ्णारे आयुष्य म्हणजे ऊन पावसाचा खेळ कधी सुख तर कधी दु:ख

मन

मनात तू हृदयात तू श्वासात तू डोळ्यात तू नसलीस जवळ म्हणून काय झाले तूच तर आहेस माझे हृदय असतेस कायम बरोबर जेव्हा पासून गेली आहेस दूर

अतिथि देवो भव:

अतिथि देवो भव: WHO WILL HELP ME TO PUBLISH delhi EXP.  I HAVE WRITTEN IN NOTE BOOK BUT DUE TO SLOW NET I CANT PUBLISH,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ............PLEASE HELP ME FRIENDS......................

गब्बर सिंह का चरित्र चित्रण

Image
1. सादा जीवन, उच्च विचार: उसके जीने का ढंग बड़ा सरल था. पुराने और मैले कपड़े, बढ़ी हुई दाढ़ी, महीनों से जंग खाते दांत और पहाड़ों पर खानाबदोश जीवन. जैसे मध्यकालीन भारत का फकीर हो. जीवन में अपने लक्ष्य की ओर इतना समर्पित कि ऐशो-आराम और विलासिता के लिए एक पल की भी फुर्सत नहीं. और विचारों में उत्कृष्टता के क्या कहने! 'जो डर गया, सो मर गया' जैसे संवादों से उसने जीवन की क्षणभंगुरता पर प्रकाश डाला था. २. दयालु प्रवृत्ति: ठाकुर ने उसे अपने हाथों से पकड़ा था. इसलिए उसने ठाकुर के सिर्फ हाथों को सज़ा दी. अगर वो चाहता तो गर्दन भी काट सकता था. पर उसके ममतापूर्ण और करुणामय ह्रदय ने उसे ऐसा करने से रोक दिया. 3. नृत्य-संगीत का शौकीन: 'महबूबा ओये महबूबा' गीत के समय उसके कलाकार ह्रदय का परिचय मिलता है. अन्य डाकुओं की तरह उसका ह्रदय शुष्क नहीं था. वह जीवन में नृत्य-संगीत एवंकला के महत्त्व को समझता था. बसन्ती को पकड़ने के बाद उसके मन का नृत्यप्रेमी फिर से जाग उठा था. उसने बसन्ती के अन्दर छुपी नर्तकी को एक पल में पहचान लिया था. गौरतलब यह कि कला के प्रति अपने प्रेम को अभिव्यक्त...

प्रीत........

Image
येते जेव्हा तुझी आठवण मी माझा राहत नाही होतो तुझा आणि विसरुनी जातो सर्व चंद्र सूर्य येतात जातात पण तू असतेस सतत माझ्याबरोबर मला विश्वास आहे तुलाही माझी आठवण येते पण या जगात प्रेमाला काही किमत नाही जखडूनि ठेवतात बंधनात जे आपण कधीच तोडू शकत नाही आपल्या भावना मनात ठेवुनी शेवटी जातो मातीत मिसळूनी

सुंदर मैत्रीचा क्षण

Image
                                            अखेर २६ जानेवारीचा दिवस उजाडला आणि एका अविस्मरणीय दिवसाचा शुभारंभ झाला. धावत पळत रिक्षाने बसने शेवटी एकदाचा शिवाजी पार्कला पोहोचलो. आणि दिसले ते अनोळखी पण ओळखीचे वाटणारे चेहरे. प्राथमिक ओळख परत एकदा झाली. वैशाली ( जिच्यामुळे मी बझ्झ जॉईन केले आणि आजचा दिवस माझ्यासाठी आला), अर्जुन, मंदार, प्राची आणि प्रणिता. मला चहा पिल्याशिवाय जमत नाही त्यामुळे प्रथम  पिला तो चहा. आणि वाट पाहत बसलो अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरीची.                      प्रथम आला तो मंदार आणि त्यापाठोपाठ अतुल आणि निवी. निविला पहिले आणि माझा अंदाज खरा ठरला. ती आणि मी एकाच बस मधून आलो होतो, मी तिला स्टेशन पर्यंत फोल्लोव सुद्धा केले होते पण नंतर  विचार आला चुकून गाल सुजायाचा आणि दिवस वाया जायचा. त्यामुळे वैशू ला फोन  केला आणि गाल व्यवस्थित घेवून गेलो. आम्ही वाट पाहून फेरफटका मारायला लागलो आणि ...

दिवस....

येतील का ते दिवस परत ? जातील का हे दिवस मागे ? किती छान होते ते दिवस.. ज्यांना माहित नव्हती रात्र......

माझी मनी

   रात्रीचे 12 वाजून गेले होते मी अभ्यास करत बसलो होतो. अचानक बाहेरून मांजराचा भांडण्याचा  आवाज आला पण  मी दुर्लक्ष  केले, पण नंतर लक्षात आले आमचे  मनी बाहेरच होते. मी पटकन उठलो आणि  हातात जे सापडेल ते घेवून बाहेर आलो  आणि  आवाजाच्या  दिशेने फेकले. आवाज बंद झाला आणि माझा आवाज चालू  झाला. मनिला खुप हाका  मारल्या पण व्यर्थ. मी परत अभ्यास करत बसलो पण लक्ष लागत  नव्हते. २-३ वेळा बाहेर येवून पहिले पण मनी काय दिसली नाही. मी विचार करत झोपी गेलो.      सकाळी जाग  आली ती आईच्या आवाजाने. मनी कुठे आहे रात्री आत घेतली होतीस काय? मी काहीच बोललो नाही. कॉलेजला  जायच्या वेळी आई ला  रात्रीचा सर्व प्रकार सांगितला तसे आईने श्लोक वाचन केले. मी तसाच तराट  कॉलेजला  गेलो. पण लक्ष लागत नव्हते.     दुपारी दांडी मारून घरी आलो तर घराचे वातावरण गंभीर. मनीची  चौकशी केली तर ते एका कोपर्यात शांत पडलेले. आईला विचारले : कधी आले आई : आले नाही जावून आणले मी : कोठे होते? आई : शेजारी विटेच्या थ...

आठवण

       रात्रीचे १२ वाजत आले तसे त्याच्या ह्रुदयाचे ठोके वाढू लागले, बैचेनी वाढु लागली आणि एकदाचे १२ वाजले. SMS अणि कॉल चालू झाले त्याला वाढदिवसाच्या  शुभेच्या देण्यासाठी. पण त्याला हवा असलेला SMS किंवा कॉल येत नव्हता त्यामुले तो अधिकच बैचेन होत होता. तो वाट पाहत पाहत कधी झोपी गेला ते त्यालापण  कळालेच नाहि.             सकाळी जाग आली आणि प्रथम त्याने मोबाइल हातात घेवुन INBOX चेक केले, मिस कॉल चेक केले एखादा अनोळखी   नंबर दिसला तर लगेच त्याला कॉल लावला पण सर्व  व्यर्थ. दिवसभर त्याने मोबाइल एक मिनट पण दूर केला नाहि. एवढ्या  आनंदयाच्या दिवशी तो पूर्ण दिवसभर निराशाच राहिला. दिवस संपत आला तसे तो हेही विसरून गेला की आज त्याचा वादादिवास होता. रात्रि जोप्ताना त्याच्या मनात विचार आला....        एवढे सोपे असते का एखाद्याला विसरणे. प्रत्येक क्षण आपण ज्या व्यक्तीसाठी जगलो त्या शिवाय दुसर्या कशाचाही विचार केला नाही ती व्यक्ती आपणाला इतक्या सहज सहजी विसरू शकते ? चुका तर सर्वाकडून  होतात पण प्...

आठवण

का येते तुझी आठवण प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवशी झालो जरी दुसर्याचा तरी तूच आहेस माझे हृदय

दुरापास्त

तुला पाहण्यासाठी मैलोन मैल आलो तुझा आवाज ऐकण्यासाठी रात्र रात्र जागलो मग का असा दिवस यावा तुझा आवाज आणि दिसणे दुरापास्त व्हावे जरी झाली असलीस दुरापास्त तरी आवाज आहे कानात आणि चेहरा आहे डोळ्यात