Posts

Showing posts from July, 2018

नाती ..naati

नाती ....   किती सोपे शब्द आहेत नाती! पण आपले जीवन अपूर्ण आहे या शब्दांशिवाय. दिवसातून म्हणण्यापेक्षा प्रत्येक तासाला आपण हेच शब्द जगात असतो. आपल्या जन्मापासून जी सुरुवात होते ती आपले जीवन संपले तरी हा शब्द आपली पाठ सोडत नाही. पण आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे, आपण खरंच जगतो का हा शब्द? काहींचे म्हणण्यापेक्षा सर्वांचे उत्तर हो हेच असणार आहे. कारण आपण या शब्दअगोदर खूप शब्द जोडले आहेत आणि या शब्दांच्या खेळात आपण आपल्या मनाचे समाधान करत असतो. उदा. मैत्रीचे नाते, विश्वासाचे नाते.. इ.     प्रत्येकाने आपल्या परस्पर सोयीने नाती या शब्दाची व्याख्या केली आहे आणि आपण तीच जगत आहोत. पहा आठवून ३०-४० वर्षांपूर्वी आपण कधी मैत्रीचे नाते, विश्वासाचे नाते असे रोज बोलत होतो का? तर नाही. आई, पप्पा, बहीण, भाऊ, आजी, आजोबा कितीतरी नाती आपणाला आपल्या समाजाने दिली आहेत त्यांनाच आपण नातलग म्हणत असू, आणि याच नात्यातून निर्माण होणाऱ्या नवीन नात्यानं आपण दूरचे नातलग म्हणत असू आणि म्हणतो हि. आता या युगात हीच   नाती आपल्यात फार राहिली नाहीत आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण आपल्या सोयीप्रमाणे नवीन नात