माझी मनी

   रात्रीचे 12 वाजून गेले होते मी अभ्यास करत बसलो होतो. अचानक बाहेरून मांजराचा भांडण्याचा  आवाज आला पण  मी दुर्लक्ष  केले, पण नंतर लक्षात आले आमचे  मनी बाहेरच होते. मी पटकन उठलो आणि  हातात जे सापडेल ते घेवून बाहेर आलो  आणि  आवाजाच्या  दिशेने फेकले. आवाज बंद झाला आणि माझा आवाज चालू  झाला. मनिला खुप हाका  मारल्या पण व्यर्थ. मी परत अभ्यास करत बसलो पण लक्ष लागत  नव्हते. २-३ वेळा बाहेर येवून पहिले पण मनी काय दिसली नाही. मी विचार करत झोपी गेलो.
     सकाळी जाग  आली ती आईच्या आवाजाने. मनी कुठे आहे रात्री आत घेतली होतीस काय? मी काहीच बोललो नाही. कॉलेजला  जायच्या वेळी आई ला  रात्रीचा सर्व प्रकार सांगितला तसे आईने श्लोक वाचन केले. मी तसाच तराट  कॉलेजला  गेलो. पण लक्ष लागत नव्हते.
    दुपारी दांडी मारून घरी आलो तर घराचे वातावरण गंभीर. मनीची  चौकशी केली तर ते एका कोपर्यात शांत पडलेले.
आईला विचारले : कधी आले
आई : आले नाही जावून आणले
मी : कोठे होते?
आई : शेजारी विटेच्या थाप्पीवर होते.
मी : जास्त लागले नाही ना?
आई : त्याचे पोट फाडले आहे. मुंग्या  झाल्या  होत्या  त्या काढल्या

मी : त्याला दवाखान्यात न्यायला हवे
आई : नको ते बरे होईल (या अगोदरच्या मनी ला दवाखान्यातून आणल्यावर २ तासात मृतुमुखी पडल्यामुळे डॉक्टरवर विश्वास नव्हता)

   मनी ने दिवसभर काही खाल्ले नाही. खास त्याच्यासाठी हॉटेल मधून अंडे आणले होते पण काही फायदा नाही. आमची मनी घरात येवून २ वर्षे झाली होती. तिला घरात आणली त्यावेळी तिने डोळेही उघडले नव्हते. तिला चमच्याने २ दिवस दुध पाजले आणि तिची रवानगी तिच्या आई कडे केली. नानातार्पारात ७ दिवसांनी तिला परत आणले.
    सुरुवातीपासूनच प्राणी पाळण्याचा छंद होता. पण आमच्या घरी एकही टिकला नाही. त्याचा लळा लागला कि लगेच मृत्यू . यात २ वेळा शेली आणि मनीचा समावेश आहे. यामुळे घरात संध्याकाळी गढूळ वातावरण होते. आणि मला श्लोक ऐकावे लागत होते. तिला आत का घेतले नाही म्हणून.


क्रमश:

Comments

Popular posts from this blog

आयुष्य

सुंदर मैत्रीचा क्षण

गोड