आठवण

       रात्रीचे १२ वाजत आले तसे त्याच्या ह्रुदयाचे ठोके वाढू लागले, बैचेनी वाढु लागली आणि एकदाचे १२ वाजले. SMS अणि कॉल चालू झाले त्याला वाढदिवसाच्या  शुभेच्या देण्यासाठी. पण त्याला हवा असलेला SMS किंवा कॉल येत नव्हता त्यामुले तो अधिकच बैचेन होत होता. तो वाट पाहत पाहत कधी झोपी गेला ते त्यालापण  कळालेच नाहि.
            सकाळी जाग आली आणि प्रथम त्याने मोबाइल हातात घेवुन INBOX चेक केले, मिस कॉल चेक केले एखादा अनोळखी   नंबर दिसला तर लगेच त्याला कॉल लावला पण सर्व  व्यर्थ. दिवसभर त्याने मोबाइल एक मिनट पण दूर केला नाहि. एवढ्या  आनंदयाच्या दिवशी तो पूर्ण दिवसभर निराशाच राहिला. दिवस संपत आला तसे तो हेही विसरून गेला की आज त्याचा वादादिवास होता. रात्रि जोप्ताना त्याच्या मनात विचार आला....
       एवढे सोपे असते का एखाद्याला विसरणे. प्रत्येक क्षण आपण ज्या व्यक्तीसाठी जगलो त्या शिवाय दुसर्या कशाचाही विचार केला नाही ती व्यक्ती आपणाला इतक्या सहज सहजी विसरू शकते ? चुका तर सर्वाकडून  होतात पण प्रेमात तर सर्व  माफ असते ना मग असे का? त्याने कधीच तिचे ऐकले नव्हते असे नाही पण त्यावेळी त्याने ऐकले कोणताही मागचा पुढचा विचार न करता फक्त आणि फक्त तिच्यावर  विश्वास ठेवून कि ती त्याची जीवनभर मैत्रीण म्हणून राहील आणि कधी त्याची साथ नाही सोडणार पण मग आज ......

     त्याला काहीच सुचत नव्हते फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो ते अश्रू तिची आठवण म्हणून हसत  त्याची चव घेत होता. ते खारट अश्रू  देखील त्याला आज तिने चारलेल्या केक ची चव देत होते. आणि देत राहणार होते ...

Comments

  1. To Veda ahe.. Je aplyala visarale.. tyana apanahi visarayache asate......

    ReplyDelete
  2. visarat kuni kunala nasate fakta kalanusar tyavar ek padada padato...... kevha na kevha 2 sec karata ka asena ti vyakti apalya manat yeun jate

    ReplyDelete
  3. asach asat re amar..
    mhanun fakt prem vatat jave manasane..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आयुष्य

गोड

सुंदर मैत्रीचा क्षण