मला हि वाटते
मला हि वाटते तुझ्या आनंदात सामील व्हावे
कितेकदा परतुनी हि आलो
पण याचवेळी मी अशी का चूक केली परत न येण्याची
जी निरंतर बोचत राहते क्षणाक्षणाला.
मला हि वाटे तुझ्या दु:खात सामील व्हावे
पण तू का असा दुरावा केलास
माझेच मला कळेना
चूक होती माझी पण ती तुला हि मान्य होती
वेळ निघुनी जाण्याआधी का नाही अडवलेस?
मला दूर केलेस तूच पण तुझी वाट मी पाहत होतो
कितेकदा परतुनी हि आलो
पण याचवेळी मी अशी का चूक केली परत न येण्याची
जी निरंतर बोचत राहते क्षणाक्षणाला.
Mast......
ReplyDelete