सुंदर मैत्रीचा क्षण

                      



                     अखेर २६ जानेवारीचा दिवस उजाडला आणि एका अविस्मरणीय दिवसाचा शुभारंभ झाला. धावत पळत रिक्षाने बसने शेवटी एकदाचा शिवाजी पार्कला पोहोचलो. आणि दिसले ते अनोळखी पण ओळखीचे वाटणारे चेहरे. प्राथमिक ओळख परत एकदा झाली. वैशाली ( जिच्यामुळे मी बझ्झ जॉईन केले आणि आजचा दिवस माझ्यासाठी आला), अर्जुन, मंदार, प्राची आणि प्रणिता. मला चहा पिल्याशिवाय जमत नाही त्यामुळे प्रथम  पिला तो चहा. आणि वाट पाहत बसलो अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरीची.
                     प्रथम आला तो मंदार आणि त्यापाठोपाठ अतुल आणि निवी. निविला पहिले आणि माझा अंदाज खरा ठरला. ती आणि मी एकाच बस मधून आलो होतो, मी तिला स्टेशन पर्यंत फोल्लोव सुद्धा केले होते पण नंतर  विचार आला चुकून गाल सुजायाचा आणि दिवस वाया जायचा. त्यामुळे वैशू ला फोन  केला आणि गाल व्यवस्थित घेवून गेलो. आम्ही वाट पाहून फेरफटका मारायला लागलो आणि सेक्रेटरीचे आगमन झाले कल्पेश (कल्पि म्हणत नाही कारण ते नाव petented  आहे आणि त्याची roayalti  आमच्याकडे नाही). तोपर्यंत अतुलची फोटोग्राफी आणि निवी ची फास्ट लोकल  चालू झाली होतीच. म्हणता म्हणता २ तास गेले आणि आगमन झाले अध्यक्ष (गणेश) आणि उपाध्यक्ष (स्नेहा). आमची काही प्रतिक्रिया येण्या अगोदरच त्यांनी केक आणि कोल्ड्रिंक्स समोर केले आणि आमचा आवाज  गायब झाला.

                          केक कापून आमच्या दिवसाला सुरुवात झाली तोपर्यंत १ वाजला होता आणि पोटात कावळे ओरडत होते. यथावकाश मंदार ने सुजाता मध्ये नेले आणि पोटभरून कावळ्यांना शांत केले. त्याच वेळी आगमन झाले ते आमची गेस्ट प्रीती. मग काय एकदा पोट भरल्यावर आठवण झाली विठोबाची आणि पावले वळलीत ती सिद्धिविनायक कडे.  तिथून थेट फेसाळलेल्या समुद्राकडे. तिथली प्रसन्न हवा मनसोक्त घेतल्यावर चालू झाले फोटोसेशन. बझ्झ मॉडेल वेग वेगळी पोझ  देत होती पण अतुल तिचे तोंडच कॅमेरात घेत होता.
              समुद्र काठावर ट्रेकिंग !!!!!! काय अतुलनीय प्रसंग होता तो. मी माझ्या मोबोईल मध्ये तो कायमचा फिट करून ठेवला.
                     शेवटी जो नको होता क्षण जवळ आला ...... निरोप !!!!!!!!! सर्वांचे चेहरे पडलेले मोबोईल नंबर एक्स्चेंज करून सर्वांची पावुले चालली परतीला. पण पावुले जड झाली होती. भेटण्याअगोदर वाटले होते अनोळखी स्वभाव अनोळखी चेहरे पण कधी वाटलेच नाही ते, आम्ही सर्व अनोळखी आहोत आणि प्रथम भेटत आहोत. आमची भेट होती अगदी लहानपनापासून  ओळखत असल्यासारखी. सोशल नेटवर्किंगचे फायदे , तोटे  ऐकले होते वाचले होते पण अनुभवत होतो एक सुंदर मैत्रीचा क्षण.


          वैशुचे मौनव्रत तर निवीची फास्ट लोकल,
          निलेशचा अबोलपणा तर अर्जुनचा शांतपणा,
          मंदारचे लाजणे तर काल्पेशाचे बागडणे,
          काळजीवाहू गणेश तर भेदरलेली प्रीती,
          मॉडेल स्नेहा तर फोटोग्राफर अतुल,
          प्राची, प्रणिता हम साथ साथ है.
पण न विसरणारी एकच गोष्ट, जी प्रत्येक वेळी आठवेल घरातून बाहेर पडताना घरात प्रवेश करताना. आणि ती म्हणजे स्नेहा चे sandal  प्रेम !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

शेवटी काय  तर .....
                 मैत्री म्हणजे सुंदर पहाट
                कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
                आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
               सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
               फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
               कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
               आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
               हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
               मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
              अन् जणू दरवळणारा मारवा
              अंगावर घ्यावा असा राघवशेला
             एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
             ऍकत रहावी अशी हरीची बासरी
             अस्मानीची असावी जशी एक परी...
             मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
             दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

 .

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आयुष्य

गोड