सुंदर मैत्रीचा क्षण
अखेर २६ जानेवारीचा दिवस उजाडला आणि एका अविस्मरणीय दिवसाचा शुभारंभ झाला. धावत पळत रिक्षाने बसने शेवटी एकदाचा शिवाजी पार्कला पोहोचलो. आणि दिसले ते अनोळखी पण ओळखीचे वाटणारे चेहरे. प्राथमिक ओळख परत एकदा झाली. वैशाली ( जिच्यामुळे मी बझ्झ जॉईन केले आणि आजचा दिवस माझ्यासाठी आला), अर्जुन, मंदार, प्राची आणि प्रणिता. मला चहा पिल्याशिवाय जमत नाही त्यामुळे प्रथम पिला तो चहा. आणि वाट पाहत बसलो अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरीची. प्रथम आला तो मंदार आणि त्यापाठोपाठ अतुल आणि निवी. निविला पहिले आणि माझा अंदाज खरा ठरला. ती आणि मी एकाच बस मधून आलो होतो, मी तिला स्टेशन पर्यंत फोल्लोव सुद्धा केले होते पण नंतर विचार आला चुकून गाल सुजायाचा आणि दिवस वाया जायचा. त्यामुळे वैशू ला फोन केला आणि गाल व्यवस्थित घेवून गेलो. आम्ही वाट पाहून फेरफटका मारायला लागलो आणि ...